मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाने आयुक्त कार्यालयाशेजारी विशेष दालन निर्माण केले आहे. आता राज्य उत्पादन शुल्क केंद्र या विभागाची सात मजली इमारत उभी राहिली आहे. येथे उभारलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात पुढील वैशिष्ट्यपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
१. भारतात मद्यपान करण्यासाठी आता वयाची २५ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे, तर बिअरसाठी ही वयोमर्यादा २१ वर्षे आहे. हीच मर्यादा वर्ष १८३९ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेतील एका राज्यात १८ वर्षे करण्यात आली होती. त्याआधी मद्यप्राशनासाठी वयाची कुठलीही अट नव्हती.
२. मद्यनिर्मिती आणि विक्रीत जगातील चीन अन् रशिया यानंतर भारताचा क्रमांक लागतो. (५.३५ अब्ज रुपयांची वार्षिक उलाढाल आहे.)
३. मद्याच्या बाटलीवर कमाल किंमत असावी, हे बंधनकारक करणारा भारत जगातील पहिला देश आहे.