Tipu Sultan Cut-Out : टिपू सुलतानचा फलक हटवण्यास धर्मांध ‘डी.वाय.एफ्.आय.’चा नकार !

कर्नाटकात पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली

टिपू सुलतानचा फलक

मंगळुरू (कर्नाटक) –  कोणाजे पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी नुकतेच ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (डी.वाय.एफ्.आय.च्या) हरेकळा शाखेच्या अध्यक्षांना नोटीस बजावून पूर्व अनुमतीविना संघटनेच्या कार्यालयाजवळ लावलेला टिपू सुलतानचा फलक काढून टाकण्याचे निर्देश दिले होते; मात्र ‘डी.वाय.एफ्.आय.’ने टिपू सुलतानचा फलक काढण्यास नकार दिला आहे.

‘डी.वाय.एफ्.आय.’चे जिल्हाध्यक्ष बी. के.  इम्तियाझ म्हणाला, ‘‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’च्या राज्य परिषदेचा एक भाग म्हणून टिपू सुलतानचा फलक उभारण्यात आला आहे. सरकारला या फलकांवर बंदी घालण्याचा अधिकार नाही.

राज्यात सरकार पालटले असले, तरी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पोलीस अजूनही संघाच्या मानसिकतेने काम करत आहेत.’’ २५ फेब्रुवारीपासून तोक्कोट्टू येथे होणार्‍या कर्नाटक राज्य परिषदेचा भाग म्हणून उभारलेला टिपू सुलतानचा फलक काढण्यास त्याने नकार दिला आहे.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर तेथील धर्मांध संघटना उद्दाम झाल्या आहेत, हेच यातून दिसून येते !
  • हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस या संघटनेला वठणीवर आणणार कि त्यांच्या समोर झुकणार ?
  • डी.वाय.एफ्.आय.चा अध्यक्ष मुनीर काटिपळ्ळ याचा थयथयाट

  • (म्हणे) ‘भाजपला आवडत नाही; म्हणून आम्ही टिपूचे चित्र काढणार नाही !’

डी.वाय.एफ्.आय.चा अध्यक्ष मुनीर काटिपळ्ळ

डी.वाय.एफ्.आय.चा राज्य अध्यक्ष मुनीर काटिपळ्ळ याने पत्रकारांशी बोलतांना सांगितले, ‘पोलिसांनी ‘तुम्ही अनुमती घेतली नाही. चित्रामुळे कायदा सुव्यवस्थेला धक्का बसतो’, असे सांगितले. येथे अनुमतीचा प्रश्‍न नाही. टिपूचे चित्र लावले म्हणून भाजप वाद घालून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला घाबरून पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे. टिपूचे चित्र आम्ही कोणत्याही कारणाने काढणार नाही. ग्रामपंचायतीकडून आम्ही अनुमती मिळवली आहे. कोणत्याही कारणाने टिपू वादग्रस्त व्यक्ती नाही. केवळ भाजपला टिपू आवडत नाही; म्हणून आम्ही त्याचे चित्र काढण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. दक्षिण कन्नड जिल्ह्यावर टिपू सुलतानने राज्य केले. या भूमीवर ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला आहे. राणी अब्बक्का आणि टिपू सुलतान या दोघांचेही चित्र आम्ही लावले आहे.

संपादकीय भूमिका

टिपूचे वंशज ज्या राज्यात कार्यरत आहेत, तेथे हिंदूंवर अत्याचार झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !