मुंबई – सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून नागरिकांना फसवल्यानंतर जे गुन्हे उघडकीस आले, त्या संबंधितांचे वर्षभरात २४.५ कोटी रुपये त्यांच्या खात्यांत जमा करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ही माहिती दिली आहे. वर्ष २०२३ पासून बोगस संपर्क, संदेश, ई-मेल यांमुळे नागरिकांची हानी होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस विशेष लक्ष देत आहेत. मुंबई टेक विक हा स्टार्ट-अप महोत्सव १८ ते २३ फेब्रुवारीपर्यंत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यात ते बोलत होते.