सातारा, २० फेब्रुवारी (वार्ता.) – महाबळेश्वर तालुक्यातील खिंगर येथील एका ‘टेन्ट हाऊस’वर पोलिसांनी धाड घातली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १२ बारबाला आणि २५ शेतीपूरक खतविक्रेते यांना कह्यात घेण्यात आले.
१८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. टेन्ट हाऊसवरील एका मोठ्या सभागृहात १२ बारबाला तोकडे कपडे परिधान करून, अश्लील हावभाव करत नृत्य करत होत्या. उपस्थित खतविक्रेते या बारबालांशी लगट करत नृत्य करत होते. पोलिसांची चाहूल लागतात त्यातील ४ जण पळून गेले. उर्वरित लोकांना पोलिसांनी कह्यात घेतले असून सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील खतविक्रेते असल्याचे समजते. १२ बारबालांना नोटीस देऊन सोडण्यात आले. खतविक्रेत्यांच्या महागड्या गाड्या, पारंपरिक आणि आधुनिक संगीत साहित्य असा मिळून ६८ लाख १९ सहस्र ६०९ रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे. खत विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकासातारा येथे वारंवार डान्सबारवर धाडी घालण्याची कारवाई करण्यात आली आहे. तरीही अश्लील नृत्याचे प्रकार चालूच आहेत. पोलीस कठोर कारवाई करत नसल्याचे हे निर्देशक आहे. |