इंडिया आघाडीच्या समन्वयासाठी समितीची स्थापना !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत चालू असलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत १ सप्टेंबर या दिवशी समन्वयासाठी १३ जणांची समिती स्थापन करण्यात आली.

राजस्थानमध्ये ९३ वर्षीय महंत सियाराम दास यांची हत्या

महंत सियाराम दास बाबा बुरिया गेल्या ५० वर्षांपासून श्री महादेव मंदिरात राहून पूजा करत  होते. त्यांच्या हत्येमुळे संत समाजात अप्रसन्नता निर्माण झाली आहे.

कोकण समुद्र किनारपट्टींवर सापडलेल्या चरस प्रकरणात रत्नागिरी पोलीस ‘इंटरपोल’चे साहाय्य घेणार !

समुद्रातून वहात आलेल्या चरसच्या पाकिटांच्या बॅगेवर ‘पाकिस्तान’ आणि ‘अफगाणिस्थान’ असे लिहिलेले आहे. या प्रकरणी आता रत्नागिरी पोलीस ‘इंटरपोल’चे साहाय्य घेणार आहेत.

‘चकोते’ आस्थापनाच्या ‘रस्क’च्या वेष्टनावर केवळ इंग्रजी आणि उर्दूतून माहिती !

नांदणी येथील श्री गणेश बेकरीच्या ‘चकोते प्रीमियम रस्क’च्या (टोस्टच्या) वेष्टनावर केवळ इंग्रजी आणि उर्दू भाषांतून माहिती देण्यात आली आहे.

पाकमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ९ सैनिक ठार

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आतंकवाद्याने केलेल्या आत्मघातकी (स्वतःच्या शरिरावर बाँब बांधून त्याचा स्फोट घडवून आणणे) आक्रमण करून पाक सैन्याच्या वाहनाला उडवले.

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निदर्शने : भारतात विलीन करण्याची मागणी

निर्दशनांत सहभागी झालेले लोक भारतात विलीनीकरणाची मागणी करत आहेत. गिलगिट बाल्टिस्तान मधील नेत्यांनी पाकिस्तानी प्रशासनाला गृहयुद्धाची चेतावणी दिली आहे.

महाराष्ट्रात कार्यान्वित न झालेले ४५ ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने चालू करा !

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि औद्योगिक केंद्र असणार्‍या माणगावातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू झालेले नाही.

मतभेद नसल्याचा दावा करत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा इंडिया आघाडीचा विश्‍वास !

‘स्वीस बँकेतील पैसे घेऊन येऊ’, असे आश्‍वासन देणार्‍यांनी अद्याप काळा पैसा भारतात आणलेला नाही. आम्ही मोदी यांना हटवूच.

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात ऑक्टोबर मास ‘हिंदु वारसा मास’ म्हणून घोषित !

ब्रायन केम्प ‘हिंदु वारसा मास’ घोषित करतांना म्हटले की, ‘हिंदु वारसा मास’ हिंदूंची संस्कृती आणि भारतातील विविध आध्यात्मिक परंपरा यांवर लक्ष केंद्रित करून साजरा केला जाईल.

संभाजी ब्रिगेडच्या विरोधानंतर सातार्‍यातील विद्यालयाच्या इमारतीवरील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प काढले !

पुणे महानगरपालिकेने लाल महालातील राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या सोन्याच्या फाळाने भूमी नांगरत असल्याच्या समूह शिल्पातून दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवले आहे.