अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात ऑक्टोबर मास ‘हिंदु वारसा मास’ म्हणून घोषित !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने ऑक्टोबर मासाला ‘हिंदु वारसा मास’ असे घोषित केले आहे. राज्यात हिंदु नागरिकांचे योगदान पहाता हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबर मासामध्ये दसरा आणि दीपावली हे सण येत असल्यामुळे जॉर्जियातील हिंदु संघटना अनेक वर्षांपासून याची मागणी करत होते.

१. जॉर्जियाचे राज्यपाल ब्रायन केम्प यांनी ऑक्टोबर मासाला ‘हिंदु वारसा मास’ घोषित करतांना म्हटले की, ‘हिंदु वारसा मास’ हिंदूंची संस्कृती आणि भारतातील विविध आध्यात्मिक परंपरा यांवर लक्ष केंद्रित करून साजरा केला जाईल.

२. राज्यपाल ब्रायन केम्प यांना हिंदूंची संघटना ‘कोलिशन ऑफ हिंदु ऑफ नॉर्थ अमेरिका’ने या संदर्भात आभार व्यक्त करणारे पत्र दिले आहे. या संघटनेने म्हटले की, हिंदु धर्माने अमेरिकेत सांस्कृतिक स्तरावर मोठे योगदान दिले आहे. जॉर्जिया हिंदू आणि हिंदु धर्म यांचे योगदान जाणतो.