|

जयपूर (राजस्थान) – राजस्थानमधील टोंक येथील श्री महादेव मंदिराचे महंत सियाराम दास बाबा बुरिया (वय ९३ वर्षे) यांची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. लोकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह कह्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
महंत सियाराम दास बाबा बुरिया गेल्या ५० वर्षांपासून श्री महादेव मंदिरात राहून पूजा करत होते. त्यांच्या हत्येमुळे संत समाजात अप्रसन्नता निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शहरवासियांनी बाजारपेठ बंद ठेवली. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील डीडवाना कुचामण जिल्ह्यात संत मोहनदास यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
राजस्थानामध्ये गुन्हेगारांकडून ऋषिमुनींना लक्ष्य करण्यात येत आहे ! – भाजप
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ‘महंत सियाराम दास बाबा यांची निर्घृण हत्या होणे, ही अतिशय दु:खद घटना आहे’, असे म्हटले आहे. शेखावत यांनी काँग्रेस सरकारवर टीका करत राजस्थानामध्ये गुन्हेगारांकडून ऋषिमुनींना लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court