पुणे – लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप मित्रपरिवार पिंपरी-चिंचवड पुणे यांच्या साहाय्याने भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप यांच्या वतीने १५ ते २१ सप्टेंबर २०२३ पर्यंत प्रतिदिन दुपारी २ ते सायं. ५ या वेळेत श्री अष्टविनायक शिव महापुराण कथेचे आयोजन केले आहे. सिहोर, मध्यप्रदेश येथील प.पू. पंडित श्री प्रदीप मिश्रा यांनी सर्व भाविकांना कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम सांगवी, पिंपरी-चिंचवड येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे होणार आहे.