मुलांना उपाहारागृहातून मागवलेल्या जेवणापेक्षा घरी बनवलेले जेवण द्या ! – केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – मुलांना फावल्या वेळेत क्रिकेट, फुटबॉल किंवा अन्य आवडीचा खेळ खेळण्यास द्या. सुदृढ युवा पिढीसाठी हे आवश्यक आहे. ते भविष्यातील दीपस्तंभ आहेत, असे मत केरळ उच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी मांडले.

न्यायालयाने पुढे म्हटले की, ‘स्विगी’ आणि ‘झोमॅटो’ (घरपोच खाद्यपदार्थ पोचवणारी आस्थापने) यांच्या माध्यमांतून उपाहारगृहांतील जेवण मागवण्यापेक्षा मुलांना आईच्या हाताने बनवलेल्या स्वादिष्ट भोजनाची चव घेता येऊदे.

मैदानात खेळून घरी आल्यानंतर त्यांना आईने बनवलेल्या भोजनाचा सुगंध घेता येऊ दे. आम्ही याविषयीचा निर्णय मुलांच्या माता-पित्यांवर सोपवतो.