समाजवादी पक्षाचा नेता आझम खान याच्या ३० ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी

लक्ष्मणपुरी – समाजवादी पक्षाचा नेता आझम खान याच्या उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील ३० हून अधिक ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. आयकर विभागाच्या या धाडी आझम खान आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या काही विश्‍वस्त मंडळांशी संबंधित आहेत. या विश्‍वस्त मंडळांवर कर चुकवेगिरीचे आरोप आहेत.

आझम खान याच्या विरोधात अनेक खटले प्रलंबित आहेत. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी धामोरा येथे द्वेषपूर्ण भाषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रामपूरच्या न्यायालयाने त्याला २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. (अशा गुन्हेगारांवर निवडणूक लढवण्यासाठी कायमची बंदी घातली पाहिजे !  – संपादक)