तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन !

मंदिर विश्‍वस्‍त समितीने केवळ मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गाभार्‍यात प्रवेशाला अनुमती दिली होती; मात्र बी.आर्.एस्. पक्षाच्‍या वतीने हा शासकीय दौरा असल्‍याचा दावा करण्‍यात आला.

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍या रोखण्‍यासाठी कडक उपाययोजना करा ! – अधिवक्‍ता राहुल नार्वेकर, अध्‍यक्ष, विधानसभा

भरारी पथकांची स्‍थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्‍यात यावी. त्‍याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्‍याच्‍या, आक्रमणांच्‍या वाढत्‍या तक्रारींची तात्‍काळ चौकशी करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्‍यात यावेत, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

जगभरात भारताच्‍या विकासाचा डंका !

एकीकडे अनेक देश मंदीच्‍या गर्तेत जात असतांना भारताची अर्थव्‍यवस्‍था मात्र चांगल्‍या स्‍थितीत आहे. ग्‍लोबल रेटिंग एजन्‍सी ‘एस् अँड पी’ यांच्‍या अहवालानुसार पुढील ३ वर्षांत भारताची अर्थव्‍यवस्‍था ६.७ टक्‍क्‍यांनी वाढेल. जागतिक पातळीवर ‘आम्‍हीच दादा’ अशी बतावणी करणार्‍या चीनच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा फुगा हळूहळू फुटत आहे.

दहावी आणि बारावी इयत्तेचा निकाल न्‍यून झालेल्‍या शाळांना नोटिसा !

निकालवृद्धी कार्यक्रमाचा ५२ शाळांना लाभ झाला. या शाळांचा निकाल ८० टक्‍क्‍यांपेक्षा न्‍यून लागत असे; मात्र आता त्‍यांचा निकाल सुधारला आहे. जिल्‍ह्यातील ७५ शाळांची गुणवत्ता सुधारण्‍यासाठी निकालवृद्धी कार्यक्रम राबवण्‍यात आला.

जगन्‍नाथ रथयात्रा सोहळा उत्‍साहात साजरा !

ओडिशामधील जगन्‍नाथ पुरी येथील रथयात्रेच्‍या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्‍ट्रीय कृष्‍णभावनामृत संघ इस्‍कॉन, पुणे यांनी रथयात्रेचे आयोजन केले होते. असंख्‍य भाविक पारंपरिक वेशात यामध्‍ये सहभागी झाले होते.

भोसरीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयाची दुरवस्‍था !

विद्यालयाची इतकी दुरवस्‍था होईपर्यंत कुणीच लक्ष कसे देत नाही ? विद्यार्थ्‍यांच्‍या आरोग्‍याशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

पचायला जड आणि हलके पदार्थ कसे ओळखावेत ?

‘जे पदार्थ खाल्‍ल्‍यावर सुस्‍ती येते किंवा शरिरात जडपणा जाणवतो, ते पदार्थ पचायला जड असतात. सर्व प्रकारची पक्‍वान्‍ने, गोडधोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दुधापासून बनवलेले पदार्थ (तूप आणि ताक सोडून), कच्‍चे (न शिजवलेले) पदार्थ (उदा. कच्च्या भाज्‍या, भिजवलेली किंवा मोड आणलेली कडधान्‍ये), ही जड पदार्थांची काही उदाहरणे आहेत.

विवाह जुळवणार्‍या संकेतस्‍थळांचे खरे स्‍वरूप जाणा ! – ऋषी वशिष्‍ठ, अर्थशास्‍त्रज्ञ, देहली

भारतात जेवढी ‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्‍थळे (विवाह जुळवणारी संकेतस्‍थळे) आहेत, त्‍यांची ८० टक्‍के मालकी इस्‍लामी देशांकडे आहे. या माध्‍यमातून लव्‍ह जिहादला प्रोत्‍साहन दिले जात आहे.

केंद्रशासनाचा उपमर्द करणारी देशद्रोही राज्‍य सरकारे !

सध्‍याच्‍या स्‍थितीत भारत नागरी युद्धाच्‍या दिशेने वाटचाल करत आहे, अशी स्‍थिती होत चालली आहे. सध्‍या विरोधी पक्षांची सत्ता असलेल्‍या राज्‍यांमधील लाजिरवाण्‍या घटना आणि काही कारणांमुळे केंद्र सरकारची याविषयीची उदासीनता यांवरून सर्वसामान्‍यांना असा प्रश्‍न पडू शकतो की, केंद्र सरकार स्‍वतःवर ..

गर्भावस्‍थेतील मधुमेह : नव्‍या पिढीतील गर्भवतींचा त्रासदायक शत्रू !

‘‘डॉक्‍टर, तुम्‍ही सांगितल्‍याप्रमाणे नियमित व्‍यायाम, आहार आणि गोळ्‍या सगळे व्‍यवस्‍थित चालू आहे. आजची ‘फास्‍टिंग शुगर’ ८९ आणि ‘पीपी शुगर’ ११८ आली आहे. (जेवणापूर्वीचे आणि जेवणानंतरचे शरिरातील साखरेचे एम्.जी./डी.एल्.मध्‍ये प्रमाण) ठीक आहे ना ?