
मुंबई – गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्यात यावी. भरारी पथकांची स्थापना करून अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, आक्रमणांच्या वाढत्या तक्रारींची तात्काळ चौकशी करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात यावेत, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी पोलिसांना दिले आहेत. (असे निर्देश का द्यावे लागतात ?- संपादक) २६ जून या दिवशी राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ येथे गोहत्या रोखण्याविषयीची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) आणि गोरक्षा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे समाजकंटकांनी केलेली गोरक्षकाची हत्या या पार्श्वभूमीवर गोरक्षकांच्या हत्या रोखणे, तसेच गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंदवले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही दिले.

या बैठकीला अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) संजय सक्सेना आणि नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पशू कल्याण मंडळाचे कमलेश शाह, विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र गौशाळा संपर्कप्रमुख श्री. लक्ष्मीनारायण चांडक, गोरक्षा आणि गोसेवा क्षेत्रात कार्य करणारे डॉ. विनोद कोठारी, रमेश पुरोहित, अधिवक्ता राजू गुप्ता, अधिवक्ता सिद्धविद्या यांसह अन्य गोरक्षक उपस्थित होते. येत्या १० दिवसांत कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी