NIA Court On NGOs Involvement : कासगंज (उत्तरप्रदेश) हिंसाचारात स्वयंसेवी संस्थांना काय स्वारस्य ?

  • राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाचा  प्रश्‍न

  • स्वयंसेवी संस्थांना मिळणार्‍या धनाचा स्रोत आणि त्याचा उद्देश जाणून त्यावर उपाययोजना करण्याचा दिला आदेश !

तिरंगा यात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात चंदन गुप्ता या युवकाचा झालेला मृत्यू !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील कासगंज येथे २६ जानेवारी २०१८ या प्रजासत्ताकदिनी काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात चंदन गुप्ता या युवकाचा मृत्यू झाला होता. यानंतर येथे हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी नुकतेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने २८ मुसलमानांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या वेळी न्यायालयाने या प्रकरणात या हिंसाचाराला ‘पूर्वनियोजित कट’ संबोधत राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना कायदेशीर साहाय्य पुरवणार्‍या विविध देशी आणि विदेशी स्वयंसेवी संस्थांच्या (अशासकीय संस्थांच्या -एन्.जी.ओ.- नॉन गर्व्हमेंट ऑर्गनायझेशनच्या) वाढत्या हस्तक्षेपावर चिंता व्यक्त करत ‘त्यांना या हिंसाचारात काय स्वारस्य आहे ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला.

‘या स्वयंसेवी संस्थांना निधी कुठून मिळत आहे आणि त्यांचा सामूहिक उद्देश काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेत त्यांचा अनावश्यक हस्तक्षेप रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी या निकालाची प्रत ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ आणि केंद्रीय गृहसचिव यांना पाठवावी’, असे न्यायालयाने त्याच्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी त्यांच्या १३० पानांच्या आदेशात निरीक्षण नोंदवले आहे.

स्वयंसेवी संस्थांचा धर्मांध मुसलमान कल धोकादायक !

न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे

१. स्वयंसेवी संस्थांचा हिंसाचाराविषयीचा कल धोकादायक !

स्वयंसेवी संस्थांचा हा कल न्यायपालिकेविषयी अतिशय धोकादायक आणि संकुचित विचारांना प्रोत्साहन देत आहे. न्यायपालिकेशी संबंधित सर्व घटकांनी यावर विचार केला पाहिजे.

२. दंगलखोरांना कठोर शिक्षा आवश्यक !

कासगंज हिंसाचार हे एक पूर्वनियोजित कृत्य आहे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवर अशी कृत्ये करणार्‍या गुन्हेगारांना आणि दंगलखोरांना एक सशक्त संदेश देण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा देणे योग्य आहे.

काय होते प्रकरण ?

२६ जानेवारी २०१८ या दिवशी चंदन गुप्ता यांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी कासगंजमध्ये तिरंगा यात्रेचे नेतृत्व केले होते. यात्रा शासकीय कन्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचताच सलीम, वसीम आणि नसीम यांच्यासह अनेक सशस्त्र आरोपींनी रस्ता अडवला. त्यांनी तिरंगा हिसकावून त्याचा अवमान केला आणि यात्रेतील सहभागींना ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणण्याची मागणी केली. 

सलीमने केली चंदनची हत्या

चंदन गुप्ता याने याला विरोध केला, तेव्हा मुसलमानांनी दगडफेक आणि गोळीबार केले. सलीम याने चंदन यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमान आरोपींना देशी आणि विदेशी स्वयंसेवी संस्थांनी कायदेशीर साहाय्य पुरवल्यावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा  न्यायालयाला  प्रश्‍न?
  • देशद्रोही आणि हिंदुद्वेषी आरोपींना साहाय्य करणार्‍या अशा संघटनांवर देशात बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांना अन् कार्यकर्त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
  • भारताने अशा संस्थांच्या संदर्भातील कायदे अधिक कठोर करण्याची आवश्यकता आहे, हे या घटनेतून लक्षात येते !