‘हलाला’ म्हणजे काय ?
मुसलमान महिलेला तलाक दिल्यानंतर तिला पुन्हा त्याच व्यक्तीशी विवाह करायचा असेल, तर त्यापूर्वी तिला दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवावा लागतो.
नवी देहली – सामाजिक माध्यमावर एक मुसलमान महिला ‘हलाला’विषयी व्यथा मांडतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात पीडित महिला म्हणते, ‘मी माझ्या पतीसोबत लग्न करून सासरी गेली. काही दिवसांनी आमचा घटस्फोट झाला. त्यानंतर माझा सासर्यासोबत हलाला झाला. त्यानंतर मी सासर्याच्या मुलाची आई झाले. नंतर मी माझ्या पतीशी पुन्हा लग्न केले. कालांतराने पतीने मला पुन्हा घटस्फोट दिला. त्यानंतर माझ्या पतीने मला त्याच्या भावासोबतर हलाला करण्यास सांगितले. नंतर ती त्याची वहिनी बनली. यात एकप्रकारे माझा लैंगिक छळ झाला. ‘कधी मी माझ्या पतीची आई बनली, तर कधी मला त्याची वहिनी बनण्यास सांगण्यात आले, तर कधी मी माझ्या नवर्याची पत्नी होते. हे सर्व करण्यासाठी मी आहे का ?’ ‘हलाला संपला पाहिजे’, अशी प्रतिक्रिया त्या पीडित महिलेने व्यक्त केली आहे.
पीडित महिलेने सांगितले की,
१. वर्ष २००९ मध्ये माझे लग्न झाले. मला २ वर्षे मूल न झाल्याने माझ्या पतीने मला घटस्फोट दिला. हा विषय घरात ठेवण्यासाठी त्याने मला त्याच्या वडिलांसोबत म्हणजे माझ्या सासर्यासोबत हलाला करण्यास सांगितले. नंतर तिचे लग्न सासर्यांशी करण्यात आले. त्याच्यापासून तिला एक मूल झाले.
२. वर्ष २०१७ मध्ये सासर्याने तलाक दिल्यावर मी परत माझ्या पतीशी विवाह केला. त्यानंतर पतीने पुन्हा मला तलाक दिला. त्यानंतर पतीने मला त्याच्या भावासोबत हलाला करण्यास सांगितले. मी त्याला आक्षेप घेतला.
३. मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवू शकते; परंतु मी त्यांचे वडील आणि भाऊ यांच्यासोबत संबंध ठेवू शकत नाही. माझ्या माहेरच्यांनी आक्षेप घेतल्यावर सासरच्यांनी मला त्यांच्यासोबत जाण्यास सांगितले.
संपादकीय भूमिका‘हिंदु धर्म स्त्रीविरोधी आहे’, अशी टिमकी वाजवणार्यांना कथित स्त्रीमुक्तीवाल्यांना मुसलमानांमधील ‘हलाला’ ही प्रथा दिसत नाही का ? कि त्यांना ती योग्य वाटते ? |