सर्व मंत्र्यांनाही अतिमहनीय (व्हीआयपी) द्वारातून प्रवेश
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेतले. २६ जून या दिवशी राज्य मंत्रीमंडळातील सर्व सहकारी, आमदार, खासदार आणि पक्षाचे विविध पदाधिकारी अशा ४०० जणांच्या ताफ्यासह मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सोलापूर येथे मुक्कामासाठी आले होते.
मंदिर विश्वस्त समितीने केवळ मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गाभार्यात प्रवेशाला अनुमती दिली होती; मात्र बी.आर्.एस्. पक्षाच्या वतीने हा शासकीय दौरा असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर मंदिर समितीने सर्व मंत्रीमंडळाला गाभार्यात प्रवेश देऊन दर्शनासाठी अनुमती दिली. त्यानुसार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासमवेत आलेले प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी अतिमहनीय (व्हीआयपी) द्वारातून मंदिरात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा बी.आर्.एस्. पक्षात प्रवेश !
सरकोली येथील शेतकरी मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी बी.आर्.एस्. पक्षात प्रवेश केला. या वेळी भालके म्हणाले, ‘‘मागील निवडणुकीत पंढरपूरकरांनी मतदानरूपी आशीर्वाद दिले. पराभव झाला; पण काम थांबवले नाही. इच्छाशक्ती असणार्याला पंढरपूरकर प्रतिसाद देतीलच.’’