कन्नौज (उत्तरप्रदेश) – येथील बालापीर परिसरात समाजवादी पक्षाचे नेते कैश खानने यांनी बेकायदेशीररित्या बांधलेले सभागृह बुलडोझरच्या साहाय्याने पाडण्यात आला. या वेळी उपजिल्हाधिकारी सदर रामकेश यांच्यासह पालिका कर्मचारी आणि पोलीस उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी रामकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार कैश खान यांनी समाजवादी पक्ष सत्तेत असतांना एका रस्ता अवैधपणे कह्यात घेऊन सभागृह उभारले होते.
१. १४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी कैश खान यांना प्रशासनाने अवैध अतिक्रमण हटवण्याविषयी नोटीस पाठवली होती. अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने त्यांना ३ दिवसांची मुदत दिली होती. कैश खान यांनी न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळवल्याने याविषयीची प्रक्रिया थांबली होती. स्थगिती आदेशाची मुदत संपल्यानंतर ७ जानेवारीला प्रशासनाने अवैध बांधकाम पाडले.
२. समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी बालापीर परिसरातील २०० वर्षे जुन्या श्री जागेश्वरनाथ शिवमंदिरावर अतिक्रमण केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. कैश खानने समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात प्राचीन जागेश्वरनाथ शिवमंदिरावर नियंत्रण मिळवून तेथे ३ मजली घर बांधल्याचा आरोप करण्यात आला होता.
संपादकीय भूमिकासमाजवादी पक्षाच्या बर्याच धर्मांध नेत्यांनी सरकारी किंवा हिंदू यांच्या भूमीवर अतिक्रमण करणे यांसारखे अनेक प्रकार समोर आले आहेत. या पक्ष म्हणजे गुंड, हिंदुद्वेषी आणि समाजद्रोही नेत्यांचा भरणा असलेला पक्ष आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ? अशा पक्षावर बंदीच हवी ! |