मुंबई पोलीस भरतीत बटण कॅमेर्‍याचा वापर करून ब्‍ल्‍यूटूथद्वारे शेकडो जणांनी लिहिली उत्तरे !

एका उमेदवाराकडून १० लाख रुपये घेतले !

कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते दुसरीकडे हलवावेत !  – सर्वोच्‍च न्‍यायालय

मध्‍यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्‍ये आफ्रिकेतून आणलेल्‍या चित्त्यांपैकी ३ चित्त्यांचा गेल्‍या २ मासांत मृत्‍यू झाला. यावरून सर्वोच्‍च न्‍यायालयाने चिंता व्‍यक्‍त करत ‘त्‍यांना दुसर्‍या उद्यानात हलवण्‍याचा विचार करावा’, असे सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी २८ मे या दिवशी करणार नव्या संसद भवनाचे उद्घाटन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २८ मे या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पां’तर्गत ही इमारत बांधण्यात आली आहे.

हिंदूंना ‘भाईचारा’ शिकवणारे जामा मशिदीत हनुमान चालिसा पठणाला अनुमती देतील का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

सुनील घनवट म्हणाले, ‘‘त्र्यंबकेश्‍वर मंदिरात धूप दाखवायला निघालेले उत्तरप्रदेशमध्ये ज्ञानव्यापी मंदिरात मात्र हिंदूंच्या प्रवेशाला विरोध करतात.

‘द केरल स्टोरी’च्या चमूकडून ‘अर्श विद्या समाजम्’ला ५१ लाख रुपयांची देणगी !

‘अर्श विद्या समाजम्’ ही संघटना लव्ह जिहादला बळी पडून धर्मांतर केलेल्या मुलींना स्वधर्मात आणण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कार्य करते.

आसाममध्ये चारचाकी गाडीत ४ मुसलमानांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसेन आणि मोमिनूर रहमान अशी बलात्कार करणार्‍यांची नावे आहेत.

नेदरलँड्समध्ये ‘द केरल स्टोरी’च्या प्रदर्शनास आरंभ !

कुठे नेदरलँड्समधील जनतेने चित्रपटाच्या माध्यमातून ‘जिहाद’ विरोधात सतर्क व्हावे, असे वाटणारे खासदार गीर्ट विल्डर्स, तर कुठे जिहादी आतंकवादाने होरपळून निघालेल्या बंगाल राज्यात चित्रपटावर बंदी लादणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी !

ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि शिवलिंगाची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी हे सर्वेक्षण आणि चाचणी करण्याची अनुमती दिली होती. याला ज्ञानवापी मशीद प्रबंधन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अशी स्थगिती दिली.

श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तांवर कपडे परिधान करण्याच्या संदर्भात निर्बंध नाहीत !

मंदिरांचे पावित्र्य जपण्यासह भाविकांनाही आध्यात्मिक लाभ मिळवून देऊ शकणारे निर्णय घेऊन ते त्वरित मागे घेणे, यातून सरकारी अधिकार्‍यांची मंदिरांप्रती कचखाऊ भूमिका ! ‘मंदिरे भक्तांच्या हाती सोपवणे का आवश्यक आहे’, हे यातून लक्षात येते !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणच्या फलकावर अशुद्ध लिखाण !

मराठी भाषाशुद्धीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तळमळीने प्रयत्न केले; पण त्यांच्याच जन्मस्थळाच्या ठिकाणी शुद्धलेखनाची अशी दुरावस्था होणे दुर्दैवी ! मराठी भाषेचे अशा प्रकारे वाभाडे काढणार्‍या संबंधितांना शिक्षाही करायला हवी !