विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांची चेतावणी !
नागपूर – मिरवणुकीनंतर जिहादी मानसिकतेच्या काही मुसलमान तरुणांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न अयशस्वी होऊन पुढील अनर्थ टळला. मागील वर्षीही असाच अयशस्वी प्रयत्न झाला होता. यापुढे हिंदूंच्या मंदिरात कुणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास हिंदु समाजाकडून सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी १८ मे या दिवशी एका निवेदनाद्वारे दिली आहे.
मिलिंद परांडे यांनी निवेदनात म्हटले आहे की,
१. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी गर्भगृह तथा पवित्र परिसरात कुठेही मुसलमान अथवा गैरहिंदूंना मंदिराचे पावित्र्य अबाधित रहावे; म्हणून प्रवेशबंदी आहे, तसेच शिरकाव करण्याची अनुमती नाही.
२. अनेक मंदिरांमध्ये मुसलमानांच्या माध्यमातून विवाद उत्पन्न करण्याचा आणि ताबा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जिहादी मानसिकतेचा इतिहास पहाता केवळ मंदिरच नव्हे, तर हिंदूंच्या मालमत्तेवर विवाद उत्पन्न करून ताबा घेण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी होत आहेत. ‘हे मोठे कारस्थान असावे’, असे वाटते. याच कारस्थानाचा भाग म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिरात हा वाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३. त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरकाव करण्याचा असा प्रयत्न करणार्या जिहादी मानसिकतेच्या मुसलमान तरुणांवर गुन्हे नोंद करून आणि त्यांना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी.
४. हिंदु समाज अशा प्रकारच्या मंदिरात शिरकाव करण्याच्या, मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा सर्व प्रकार आणि कारस्थान यांचा जोरदार विरोध करून सडेतोड उत्तर देईल. अशा घटना भविष्यामध्ये घडू नयेत, समाजाची शांती भंग होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शासन अन् प्रशासन यांनी उत्तरदायीपणे लक्ष घालून अनर्थ टाळावा.