ब्युटी पार्लरच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या पाद्य्रासह तिघांना अटक

अटक करण्यात आलेले आरोपी

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी फसवल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी पाद्री आणि त्याची पत्नी यांच्यासह तिघांना अटक केली. या प्रकरणी स्थानिक भाजप महिला नेत्या सुनीता आरोरा यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीत, ‘मला ब्युटी पार्लरमध्ये बोलावून माझे धर्मांतर करण्याचा डाव होता. तेथे गेल्यावर माझ्या गळ्यातील श्रीकृष्णाचे लॉकेट काढण्यात आले. मी जेव्हा ब्युटी पार्लरमध्ये पोचली, तेव्हा तेथे उपस्थित ६ जण हातात पुस्तके घेऊन प्रार्थना करत होते. पाद्री इब्राहिम थॉमस तेथे लोकांना प्रार्थनेसाठी नेत होते. इब्राहिमने माझ्या गळ्यातील भगवान श्रीकृष्णाचे लॉकेट काढण्यास सांगितले. एवढेच नाही, तर त्याने मला माझ्या घरातील देवी-देवतांची चित्रे काढण्यास सांगितले. हे सर्व केल्यानंतर येशू ख्रिस्ताचे दर्शन होईल, असे पाद्रीने त्यांना सांगितले होते’, असा आरोप सुनीता यांनी केला आहे.

धर्मांतराचा हा प्रकार सुनीता अरोरा यांच्या लक्षात आला. त्यांनी त्यांच्या काही सहकार्‍यांना घटनास्थळी बोलावून घेतले. यानंतर त्यांनी तिन्ही आरोपींना पकडून खोडा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या पाद्य्रांचे खरे स्वरूप ! भारतभर धर्मांतरविरोधी कायदा करणे का आवश्यक आहे, हे या उदाहरणातून लक्षात येते !