रशियानेही त्याच्याकडील तैनात अण्वस्त्रांची माहिती देण्याची अमेरिकेची मागणी !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने स्वतःकडून एकूण १ सहस्र ४१९ अण्वस्त्रे तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती सार्वजनिक केली आहे. वर्ष २०११ मध्ये रशियासमवेत झालेल्या कराराच्या अंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे.
अमेरिका के पास 1419 डिप्लॉएड परमाणु हथियार: न्यू स्टार्ट ट्रीटी के तहत किया खुलासा, रूस से कहा- अपने न्यूक्लिअर हथियारों की भी जानकारी दें#America #NuclearWeapon https://t.co/DkVHrXqn2P pic.twitter.com/3z3WyLnmkR
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) May 16, 2023
दुसरीकडे युक्रेन समवेतच्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे रशियाने हा करार स्थगित केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेवर या माहितीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. अमेरिका आता रशियावर अण्वस्त्रांची माहिती देण्यासाठी दबाव आणत आहे. रशियानेही त्याच्या अण्वस्त्रांची माहिती द्यावी, अशी अमेरिकेने मागणी केली आहे.