सिंधुदुर्ग : यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैधरित्या वृक्षतोड करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

यशवंतगडाच्या तटबंदीला लागून, तसेच सी.आर्.झेड्. कायद्याचे उल्लंघन करून या क्षेत्रात असलेल्या डोंगरात अवैध उत्खनन आणि बांधकाम तसेच विविध प्रजातींची झाडे वनविभागाच्या अनुमतीविना कापून पर्यावरणाचा र्‍हास करण्यात आला आहे.

गोवा : अश्वे-मांद्रे किनारी भागातील अवैध पार्ट्या मांद्रे पंचायतीच्या सरपंचांनी बंद पाडल्या

अश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल एक मासासाठी अनुज्ञप्ती दिली आहे. सरपंचानी याविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना ‘अशी अनुज्ञप्ती देणे कायद्यात बसते का ?’ याचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.

गोवा : उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा १२ वाजता सुटल्या !

राज्यात उष्णतेच्या लाटेची नोंद घेऊन शिक्षण खात्याने ९ आणि १० मार्च या दिवशी शाळा १२ वाजेपर्यंत सोडाव्यात, असा आदेश काढला आणि ९ मार्च या दिवशी बहुतांश शाळा १२ वाजता सोडण्यात आल्या.

गोव्यात ठिकठिकाणी आगीच्या दुर्घटना : म्हादई अभयारण्य अजूनही धुमसत आहे !

वन क्षेत्रातील संभाव्य आगीचे प्रकार नियंत्रणात आणण्याच्या हेतूने वन खात्याच्या सज्जतेसाठी अग्नीशमन दलाने वर्ष २०२१ मध्ये काही शिफारसी केल्या होत्या. या सर्व दुर्घटनांवरून वन खात्याने या शिफारसींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

कर्मकांडाचे महत्त्व !

‘बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मातील कर्मकांडाला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात; पण कर्मकांडाचा अभ्यास केला, तर त्यात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गड-दुर्ग रक्षणासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद !

विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी ९ मार्च या दिवशी महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३-२०२४ साठीचा १६ सहस्र १२२ कोटी रुपये महसुली तुटीचा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि धार्मिक संवर्धन करणारा अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्पातील विविध स्तरांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी !

शिवराज्याभिषेक महोत्सव आणि गड-दुर्ग संवर्धन यांसाठी ६५० कोटी रुपयांचा निधी !

अर्थसंकल्पाविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया…

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सिद्ध केलेला अर्थसंकल्प ! – अजित पवार

नेपाळमधील रक्तरंजित उठाव !

नेपाळी जनतेने पंतप्रधानांच्या विरोधात आवाज उठवला आहे आणि न्यायालयात याविषयी सुनावणी चालू आहे. तेथील साम्यवाद उखडण्यासाठी जनता रस्त्यावर आली, ही चांगली गोष्ट आहे. नेपाळ साम्यवाद्यांच्या जोखडातून मुक्त होणे, हे भारताच्या हिताचे आहे.