(म्हणे) ‘उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला मुसलमान शासकाने भूमी दिली होती !’ – काँग्रेसचे नेते मिथुन राय

धादांत खोटी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा नेत्यांना कारागृहात टाका !

चांगले किंवा वाईट आतंकवादी असा भेद करणे चुकीचे !

आतंकवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध केला पाहिजे. आतंकवादाच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन होऊच शकत नाही. पाकिस्तानकडे बोट दाखवत कंबोज म्हणाल्या की, आतंकवाद्यांना आश्रय देणारे देश ओळखले पाहिजेत. त्यांना त्यांच्या कृतीसाठी उत्तरदायी धरले पाहिजे.

चीन आमचे नेते आणि अधिकारी यांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे !

मायक्रोनेशियाच्या राष्ट्रपतींचा आरोप !

लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आदींच्या १५ ठिकाणांवर ‘ईडी’च्या धाडी

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असतांना त्यांनी भूमीच्या बदल्यात नोकरी देण्याचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

जर्मनीत चर्चमधील गोळीबारात ७ जण ठार

या आक्रमणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चर्चच्या परिसरात नाकाबंदी केली आहे.

आरे कॉलनीमधील अतिक्रमण हटवण्याविषयी समिती स्थापना होणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटन विकासमंत्री

आरे कॉलनीमध्ये भाड्याने देण्यात आलेल्या भूमीचे करार समाप्त होऊनही त्या जमिनी सोडण्यात आलेल्या नाहीत. हे अतिक्रमण हटवण्याविषयीचे धोरण निश्चित करण्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली.

राज्यशासन विद्यार्थिनींसाठी १ रुपयात ८ ‘सॅनिटरी पॅड’ देणार !

विद्यार्थिनींसाठी १ रुपयात ८ सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता. या योजनेचे प्रारूप सिद्ध करून येत्या १५ दिवसांत ही योजना लागू करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

राज्यातील रस्त्याच्या कामांतील वस्तू आणि सेवा करातील २८ कोटी रुपये ठेकेदाराच्या खिशात !

राज्यात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्ष २०१७ मध्ये करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांवरील वस्तू अन् सेवा करातील २८ कोटी ३६ लाख रुपये ठेकेदाराच्या खिशात गेले आहेत.

आरोग्य विभागातील १० सहस्र ५०० रिक्त पदे २ मासांत भरू ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

पेपरफुटी आणि अनियमितता यांमुळे वर्ष २०१९ मध्ये घोषित करण्यात आलेली आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती अद्याप झालेली नाही. येत्या २ मासांत ही भरती आम्ही पूर्ण करू, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.