वेंगुर्ला – रेडी गावातील यशवंतगडाच्या तटबंदीला लागून, तसेच सी.आर्.झेड्. कायद्याचे उल्लंघन करून या क्षेत्रात असलेल्या डोंगरात अवैध उत्खनन आणि बांधकाम करण्यात आले आहे. यात येथे पूर्वीपासून असलेली नारळ, जांभूळ, चंदन आणि अन्य प्रजातींची झाडे वनविभागाच्या अनुमतीविना कापून पर्यावरणाचा र्हास करण्यात आला आहे.

(प्रतिकात्मक चित्र)
त्यामुळे संबंधित भूमीचे मालक, कुळ, बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्यावर वनविभागाच्या कायद्यानुसार उचित कारवाई करण्यात यावी, तसेच केलेल्या कारवाईची माहिती देण्यात यावी, अशी मागणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर यांनी एका निवेदनाद्वारे प्रादेशिक वनक्षेत्रपाल, कुडाळ यांच्याकडे केली आहे.

रेडी ग्रामपंचायतीला अहवाल सादर करण्याच्या सूचना

‘यशवंतगडाच्या तटबंदीजवळ झालेल्या बांधकामाविषयी ग्रामपंचायतीने कोणती कार्यवाही केली, याचा वस्तूस्थिती दर्शक अहवाल अभिप्राय आणि आवश्यक कागदपत्रे पुराव्यांसह ७ दिवसांत सादर करावेत, असे पत्र वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी रेडी ग्रामपंचायतीचे सरपंच, तसेच ग्रामविकास अधिकारी यांना पाठवले आहे.
हे ही वाचा –
♦ यशवंतगडानजीकचे अवैध उत्खनन आणि बांधकाम यांच्या विरोधातील उपोषण ३ र्या दिवशीही चालूच !
https://sanatanprabhat.org/marathi/656575.html