देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआयकडून चौकशी

सिसोदिया म्हणाले की, मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. संपूर्ण अन्वेषणात मी पूर्ण सहकार्य करेन. मला काही मास कारागृहात रहावे लागले, तरी मला त्याची काळजी नाही.

आतंकवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी पाकमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दोघांना अटक

अटक झालेल्यांमध्ये ठाणे येथे रहाणारा २१ वर्षीय खालिद मुबारक खान आणि तमिळनाडू येथे रहाणारा २६ वर्षीय अब्दुल्ला उपाख्य अब्दुर रहमान यांचा समावेश आहे.

सनातन धर्माच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

हिंदू आणि मुसलमान यांच्यातील संघर्ष समाप्त करण्यासाठीच आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत. भारतात सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचाच आमचा उद्देश आहे.

व्हिडिओ गेम खेळण्यास थांबवल्याने विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला अमानुष मारहाण !

विद्यार्थी वर्गात व्हिडिओ गेम खेळत असल्याने शिक्षिकेने ते थांबवण्यास सांगितल्यावर त्याला राग आला आणि त्यातून त्याने शिक्षिकेला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

दक्षिण चीन समुद्रावर चीनच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या नौदलाच्या विमानाला रोखले !

काही मिनिटांतच हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या चिनी लढाऊ विमानाने अमेरिकी विमानाला रोखले. यानंतर अमेरिकेच्या विमानाने तेथून माघार घेतली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगुर (जिल्हा नाशिक) पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

येत्या पंधरा दिवसांच्या आत भगुरला अधिकृतरित्या पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. येथे ‘थीम पार्क’ आणि संग्रहालयासाठी पाच कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वेळी केली.  

देश आणि जग यांना उपयुक्त ठरेल, असा पंचमहाभूत लोकोत्सव ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खाते

पंचमहाभूत लोकोत्सवा’चा समारोप ! 30 लाख लोकांच्या भेटीने पुरोगामी आणि साम्यवादी यांना चपराक ! कोल्हापूर, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी समाजहित, देशहित यांचे कार्य करत आहेत. या महोत्सवात ३० लाखांपेक्षा अधिक लोक येऊन गेले. या कार्यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. या लोकोत्सवाच्या माध्यमातून शिकून घेऊन त्याचा उपयोग मी राज्य आणि देश … Read more

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून हिंदु व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या !  

३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा शिकायला हवा ! – उद्योगपती नारायण मूर्ती

भारताला चीनकडून व्यावसायिक क्षेत्रातील प्रामाणिकपणा  शिकण्याची आवश्यकता आहे. वर्ष १९४० पर्यंत भारत आणि चीन यांच्या अर्थव्यवस्थेचा आकार जवळपास समान होता; पण त्यानंतर चीनचा विकास झपाट्याने झाला आणि आज त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या ६ पट आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात एका सैनिकाचा मृत्यू !

काँग्रेस सरकारची सत्ता असलेल्या छत्तीसगड येथे कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीनतेरा ! जिथे सैनिक आणि पोलीस यांच्या सुरक्षिततेची ही स्थिती आहे, तिथे सर्वसाधारण जनतेची काय कथा !