काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून हिंदु व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या !  

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथे जिहादी आतंकवाद्यांनी संजय शर्मा (वय ४० वर्षे) या काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली. शर्मा हे बँक कर्मचारी होते. ते बाजारात जात असतांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येचे दायित्व लष्कर-ए-तोयबाची शाखा असणार्‍या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने घेतली आहे. (एक जिहादी संघटना नष्ट न केल्याने त्याचाच परिणाम त्याच्या शाखा निर्माण होण्यात झाल्या आहेत, हे सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद ! – संपादक)

पोलिसांनी सांगितले की, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत व्यक्ती दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अचन भागातील रहिवासी आहे. मृत व्यक्तीच्या गावात सशस्त्र दल तैनात करण्यात आले असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • ३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • काश्मीरमध्ये सरकारी कर्मचारी असणार्‍या हिंदूंना आतंकवादी लक्ष्य करत असतांना त्यांचे संरक्षण करता येत नसेल, तर त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थानांतर करण्याची त्यांची मागणी का मान्य केली जात नाही ? त्यांना मृत्यूच्या दाढेत का ढकलले जात आहे ?