छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात एका सैनिकाचा मृत्यू !

गेल्या आठवड्याभरात एकूण ६ पोलीस अथवा सैनिक यांची हत्या !

रायपूर (छत्तीसगड) – राज्यात नक्षलवाद्यांकडून पोलीस आणि सैनिक यांच्या हत्येचा क्रम चालूच आहे. २५ फेब्रुवारी या दिवशी कांकेर येथे एका मेळ्यामध्ये आलेल्या एका सैनिकावर भर बाजारात गोळीबार करून नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केली. हा सैनिक सुट्टीसाठी बडे तेवडा येथील त्याच्या घरी आला होता. त्याची नियुक्ती आसाम येथे होती. या घटनेमुळे नक्षलवाद्यांच्या हाती मारल्या गेलेल्या पोलीस अथवा सैनिक यांची या आठवड्यातील संख्या आता ६ झाली आहे. २५ फेब्रुवारी या दिवशीच राज्यातील सुकमा जिल्ह्यात असलेल्या कुंदेडजवळ माओवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३ पोलिसांचा मृत्यू झाला होता.

संपादकीय भूमिका

काँग्रेस सरकारची सत्ता असलेल्या छत्तीसगड येथे कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीनतेरा ! जिथे सैनिक आणि पोलीस यांच्या सुरक्षिततेची ही स्थिती आहे, तिथे सर्वसाधारण जनतेची काय कथा !