नेपाळमध्ये उपपंतप्रधानांसह ४ मंत्र्यांचे त्यागपत्र
नेपाळच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगडेन यांच्यासह राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आर्.पी.पी.) ४ मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे.
नेपाळच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगडेन यांच्यासह राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आर्.पी.पी.) ४ मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे.
पाकिस्तानाने बळकावलेल्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटात ४ जण ठार, तर १० जण घायाळ झाले. हा बाँबस्फोट बरखान शहरातील रखनी मंडईमध्ये झाला.
समाजातील एखाद्या उपेक्षित घटकाविषयी सहानुभूती नसल्यामुळे जो भेदभाव वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. प्राध्यापक सुखदेव थोरात यांनी नमूद केलेले आहे, ‘आत्महत्येमुळे मरण पावलेले बहुसंख्य विद्यार्थी दलित आणि आदिवासी होते’, असा दावा भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
मी राष्ट्राध्यक्ष बनल्यास अमेरिकेच्या शत्रूंना करण्यात येणारे आर्थिक साहाय्य पूर्णपणे थांबवेन, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी स्वतःच्या नावाची घोषणा करणार्या भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांनी केली आहे.
देशभरातील ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील ५५ नदीपट्ट्यांचा समावेश आहे. यात रत्नागिरीतील ३ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे.
‘कौन चले रे कौन चले’, ‘हिंदु राष्ट्र के वीर चले’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. फेरीच्या मार्गाने अनेक चौकांत धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची देवावरची श्रद्धा नष्ट झाली . सर्वधर्मसमभाववाद्यांमुळे हिंदूंना हिंदु धर्माची अद्वितीयता कळली नाही आणि साम्यवाद्यांमुळे हिंदू देवाला मानेनासे झाले. यांमुळे देवाची कृपा न झाल्याने हिंदू आणि भारत यांची स्थिती दयनीय झाली आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कृतीशील होण्याचा आर्णी (यवतमाळ) येथील धर्मप्रेमींचा निर्धार !
असा देश कधीच समृद्ध होऊ शकत नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि योगाभ्यास यांसारखी वैदिक शास्त्रे अन् धार्मिक कृती, विविध सनातन उपासनापद्धत आदींचे गुणगान पाश्चात्त्य करत आहेत. आता त्यांनी आपल्याला शिकवण्यापूर्वी आपणच प्रत्येक गोष्टीत ते अंगीकारणे श्रेयस्कर ठरेल. त्या दिशेने हळूहळू का होईना, एक एक पाऊल मोदी शासन उचलत आहे, हे स्वागतार्ह !