आतंकवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी पाकमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दोघांना अटक

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने येथील लाल किल्ल्याजवळ दोन मुसलमान तरुणांना अटक केली. हे दोघेही आतंकवादाच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत होते. हे दोघेही सामाजिक माध्यमांतून पाकिस्तानात बसलेल्या आतंकवाद्याच्या संपर्कात आल्यानंतर कट्टरतावादाच्या मार्गाला लागले होते.

अटक झालेल्यांमध्ये ठाणे येथे रहाणारा २१ वर्षीय खालिद मुबारक खान आणि तमिळनाडू येथे रहाणारा २६ वर्षीय अब्दुल्ला उपाख्य अब्दुर रहमान यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून २ पिस्तुले, १० काडतुसे, एक चाकू आणि एक वायर कटर जप्त करण्यात आले आहे.