माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे हृदयविकाराच्या आजाराने पुणे येथे निधन !

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुणे येथे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी दुर्गप्रेमींनी एकत्र यावे  ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-  दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे आणि यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘खलिस्तानच्या आमच्या उद्दिष्टाकडे निषिद्ध म्हणून पाहू नये !’ – खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह

खलिस्तानवादी आता उघडउघडपणे त्यांच्या फाळणीच्या उद्दिष्टाला लोकमान्यता मिळवू पहात आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! सरकार आता तरी खलिस्तानी वळवळ ठेचून काढणार का ?

खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याच्या साथीदाराची पोलिसांकडून सुटका !

खलिस्तान्यांनी पोलीस ठाण्याला सहस्रोंच्या संख्येने सशस्त्र होऊन वेढा घातल्यावर पोलीस अशी माघार घेणार असतील, तर खलिस्तानवाद्यांचे मनोबल वाढून राज्यात त्यांची दहशत निर्माण होण्यास खतपाणी मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासावर फडकवला खलिस्तानी झेंडा !

ब्रिस्बेन येथील भारताच्या वाणिज्यदूत अर्चना सिंह यांना २२ फेबु्रवारीला कार्यालयात खलिस्तानी झेंडा फडकवलेला दिसून आला. यानंतर त्यांनी त्वरित क्वींसलँड पोलिसांना याची माहिती दिली.

‘कट प्रॅक्टिस’ विरोधी कायद्यासाठी मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन होणार !

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ‘महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ कट प्रॅक्टिस’ कायदा लागू करण्याविषयी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात रूपांतर करून सकारात्मक पालट घडवूया ! – आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात

भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.

खलिस्तानची भावना कायम रहाणार असून तुम्ही ती दाबू शकत नाही !

स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याची स्थिती काय झाली आहे, हे त्याच्या साहाय्याने खलिस्तानची मागणी करणार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे !

कोरेगावच्या नवीन शहर विकास आराखड्याविरोधात कडकडीत बंद !

नवीन शहर विकास आराखड्यास नागरिकांसह शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे ‘कोरेगाव बचाव संघर्ष समिती’ने ‘कोरेगाव बंद’ची जाहीर हाक दिली होती.

सातारा पोलीस दलाच्या वतीने ‘उंच भरारी योजने’चा शुभारंभ !

जिल्ह्यातील बाल गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘उंच भरारी योजने’चा शुभारंभ करण्यात आला आहे. ही योजना १५ ते २५ वयोगटांसाठी राबवली जाणार आहे.