माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे हृदयविकाराच्या आजाराने पुणे येथे निधन !

देवीसिंह शेखावत

पुणे – माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुणे येथे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने देवीसिंह शेखावत यांना येथील के.ई.एम्. रुग्णालयात दाखल केले होते; मात्र २४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. २४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेखावत यांना वर्ष १९७२ मध्ये मुंबई विद्यापिठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली होती. शेखावत हे विद्या भारती शिक्षण संस्था फाऊंडेशनद्वारे संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अमरावतीचे माजी महापौर (१९९१- १९९२) होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते.