महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्‍थेच्‍या वतीने देहली, फरिदाबाद, नोएडा आणि मथुरा (उत्तरप्रदेश) येथे पार पडले ग्रंथप्रदर्शन !

ग्रंथप्रदर्शन पहातांना जिज्ञासू

देहली – महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने सनातन संस्‍थेच्‍या वतीने देहली, फरिदाबाद (हरियाणा) आणि मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्‍यात आले. देहलीतील श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि श्री सनातन धर्म मंदिर, फरिदाबादमधील सेक्‍टर २८ अन् एन्. एच. ५ भाग, नोएडामधील न्‍यू कोंडली, सेक्‍टर ४१ आणि ४७ येथे, तर मथुरामध्‍ये गर्तेश्‍वर मंदिरासह ८ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्‍यात आले. या सर्व ठिकाणच्‍या प्रदर्शनाला शिवभक्‍तांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.