‘एम्.आय.एम्.’ घेणार मुंबई आणि नवी मुंबई येथे राष्‍ट्रीय अधिवेशन !

खासदार इम्‍तियाज जलील

मुंबई – ‘एम्.आय.एम्.’ (मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्‍लमीन) या पक्षाकडून नवी मुंबईमध्‍ये २५ फेब्रुवारी, तर मुंबईमध्‍ये २६ फेब्रुवारी या दिवशी राष्‍ट्रीय अधिवेशन घेण्‍यात येणार आहे, अशी माहिती या खासदार इम्‍तियाज जलील यांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील मुंब्रा आणि मालवणी या मुसलमानबहुल भागांत ‘एम्.आय्.एम्.’कडून सभा अन् बैठका घेण्‍यात येत आहेत.

‘एम्.आय्.एम्.’ची स्‍थापना झाल्‍यापासून या पक्षाचे हे पहिलेच राष्‍ट्रीय अधिवेशन होत आहे. येत्‍या मुंबई महानगरपालिकेच्‍या पार्श्‍वभूमीवर ‘एम्.आय्.एम्.’कडून ही मोर्चेबांधणी चालू असल्‍याचे बोलले जात आहे.