नांदेड येथील १५० कोटींच्‍या कामांवरील स्‍थगिती हटवण्‍याचा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठाने नांदेड महानगरपालिकेतील विकासकामांवरील स्‍थगिती उठवत शहरातील विकासकामांचा निधी वितरित करण्‍याचे आदेश २३ जानेवारी या दिवशी दिले आहेत.

हिंगोली येथे शेतकर्‍यांकडून रस्‍त्‍यावर दूध ओतून संताप व्‍यक्‍त !

पीक विमा न मिळाल्‍याच्‍या निषेधार्थ जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांनी चालू केलेले आमरण उपोषण सहाव्‍या दिवशीही चालूच होते. या काळात केलेली आंदोलने आणि शेतकर्‍यांकडून चालू असलेल्‍या उपोषणाची प्रशासनाकडून अपेक्षित नोंद घेतली जात नसल्‍याने शेतकरी संतप्‍त झाले आहेत.

लातूर येथे शासकीय निधीची रक्‍कम खासगी खात्‍यात जमा केल्‍याच्‍या प्रकरणी ४ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

शासकीय निधी खासगी खात्‍यात जमा करून शासनाची फसवणूक करणार्‍यांकडून तो पैसा सव्‍याज वसूल करून घ्‍यावा !

सर्वधर्मसमभाववाल्यांचे सत्य स्वरूप !

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे आंधळे, बहिरे आणि मंदबुद्धीचे आहेत अन् त्यांच्यात सत्य जाणून घ्यायची इच्छाही नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चित्रपट दिग्‍दर्शक राजकुमार संतोषी यांची मुंबई पोलिसांकडे अतिरिक्‍त सुरक्षेची मागणी !

संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ २६ जानेवारी या दिवशी प्रसारित होणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण रहित करा, अन्‍यथा परिणाम वाईट होईल, अशी धमकी मिळाल्‍याचे राजकुमार संतोषी यांनी पत्रात म्‍हटले आहे.

आय.एन्.एस्. वागीर’ पाणबुडी नौदलाच्‍या सेवेत रुजू !

पाण्‍याखालील लक्ष्याचा भेद करण्‍यासाठी पाणतीर, तर पाण्‍यावरील किंवा भूमीवरील लक्ष्याला भेदण्‍यासाठी क्षेपणास्‍त्र डागण्‍याची क्षमता या पाणबुडीत आहे.

नागपूर शहरात अस्‍वच्‍छता पसरवणार्‍यांकडून ४ मासांत १२ लाखांचा दंड वसूल !

स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांनंतरही उपराजधानीसारखी शहरे अस्‍वच्‍छ असणे हा जनतेला प्रशासनाने शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात यांपासून धर्माचे रक्षण व्‍हावे आणि पुन्‍हा एकदा हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यास कटीबद्ध होण्‍यासाठी भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वर येथे या शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

आटपाडी (जिल्‍हा सांगली) येथे धर्मांतर घडवणार्‍या गुन्‍हेगाराला पाठीशी घालण्‍यासाठी ख्रिस्‍ती समाजाचा मोर्चा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगलीतील शांतीनगर येथे हिंदु मातंग समाजाची फसवणूक करून धर्मांतर करण्‍यात आले आहे. सध्‍या महाराष्‍ट्रात धर्मांतरबंदी कायदा करण्‍यात यावा, यासाठी प्रत्‍येक शहरामध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेचे भव्‍य मोर्चे निघत असल्‍यामुळे धर्मांतरबंदी कायदा झाल्‍यास या तथाकथित नेत्‍यांची दुकानदारी बंद पडेल.