२२ कोटी ८८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड
लातूर – शासकीय कार्यालयाशी संबंधित २ बँक खात्यांतील २२ कोटी ८७ लाख ६२ सहस्र २५ रुपयांच्या रकमेचा अपहार झाला आहे. महसूल शाखेतील एका लिपिकाने विविध योजनांच्या सरकारी निधीतून २२ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम अधिकार्यांची बनावट स्वाक्षरी करून स्वतःसह भाऊ आणि भावाच्या दुकानातील कर्मचारी यांच्या खात्यावर वळवून अपहार केल्याचे समोर आले आहे.
लातूरमध्ये 22 कोटी 88 लाखांचा अपहार, शासकीय निधीची रक्कम खाजगी खात्यात; चौघांविरुद्ध गुन्हा https://t.co/aqlbsXZh07 @swaminn #LaturNews #Latur
— ABP माझा (@abpmajhatv) January 24, 2023
वर्ष २०१५ ते २०२२ या कालावधीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश काढल्यानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ४ जणांविरुद्ध एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे यांच्यासह अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे यांच्या विरोधात स्वतःच्या आणि अन्य ३ जणांच्या खात्यात रक्कम जमा करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाशासकीय निधी खासगी खात्यात जमा करून शासनाची फसवणूक करणार्यांकडून तो पैसा सव्याज वसूल करून घ्यावा ! |