काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक !

दीड कोटी व्यय (खर्च) करून निवडून आलो आहे !

सरपंच व्हायला दीड कोटी रुपये व्यय (खर्च) करावे लागत असतील, तर नगरसेवक, आमदार आणि खासदार व्हायला किती रुपये व्यय करावे लागत असतील, याची कल्पनाच करता येत नाही !

दाऊद इब्राहिमने केला दुसरा विवाह !  

दाऊदने किती विवाह केले, यापेक्षा त्याला भारतात कधी आणून फासावर कधी लटकवणार, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच भारतियांना वाटते !

महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या पोस्टवरून बांगलादेशात हिंदु तरुणाच्या घराची मुसलमानांकडून तोडफोड !

बांगलादेशात गेल्या काही वर्षांपासून हिंदूंच्या नावाने सामाजिक माध्यमांतून अशा पोस्ट करून त्यांच्यावर आक्रमण करण्याची नवी पद्धत मुसलमानांनी शोधून काढली आहे.

उत्तरप्रदेशातील अलीगडमध्ये मांस खरेदीवरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण !

उत्तप्रदेशात भाजपचे राज्य असतांना अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धर्मांधांचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

‘हिंदु विवाह कायद्या’नुसार आंतरधर्मीय विवाह अवैध ! – सर्वोच्च न्यायालय

आंतरधर्मीय विवाह ‘हिंदु विवाह कायद्या’नुसार रहित ठरतो. या कायद्यानुसार केवळ हिंदूच लग्न करू शकतात, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तेलंगाणातील एका हिंदु महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

रामगड (झारखंड) येथे अरमान खान याने विवाहित हिंदु महिलेची केली हत्या !

अशा नराधमांना फाशीची शिक्षा केल्यास अशा घटना थांबतील !

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार तज्ञांनी व्यक्त केली चिंता !

नुसती चिंता व्यक्त करून काहीच उपयोग नाही. संयुक्त राष्ट्रांनी याविषयी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे, अन्यथा ‘संयुक्त राष्ट्रे केवळ बुजगावणे आहे’, हेच स्पष्ट होईल !

(म्हणे) ‘भारताविरुद्ध ३ युद्धे लढल्यामुळेच आम्ही गरीब झालो !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

भारताने युद्ध लढण्यास सांगितले नव्हते, तर पाकलाच ती खुमखुमी होती आणि त्याचाच हा परिणाम आहे. हा परिणाम इतक्यावरच थांबणार नसून पाकची पुरती वाताहात होणार आहे, हे शरीफ यांनी लक्षात ठेवावे !

अब्दुल रहमान मक्की हा ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानी जिहादी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित केले. मक्की हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याचा मेहुणा आहे.