हरियाणातील एका सरपंचाचे विधान
हिसार (हरियाणा) – दीड कोटी रुपये व्यय केल्यानंतर मी सरपंच झालो आहे. त्यामुळे मला ‘राइट टू रिकॉल’ची (लोकप्रतिनिधीला माघारी बोलावण्याचा अधिकार) भीती दाखवणार्यांना वर्ष २०२४ मध्ये माघारी पाठवले जाईल, असे विधान येथील हांसी भागातील एका सरपंचांनी केले. त्यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ १५ जानेवारीला राज्याचे पंचायत मंत्री देवेंद्र बबली यांच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातील आहे.
संपादकीय भूमिकानिवडणूक जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो, हे देशातील प्रत्येक व्यक्तीला ठाऊक आहे. पैसे वाटल्याविना मते मिळत नाहीत, हेही ठाऊक आहे. तेच हे सरपंच सांगत आहेत ! सरपंच व्हायला दीड कोटी रुपये व्यय (खर्च) करावे लागत असतील, तर नगरसेवक, आमदार आणि खासदार व्हायला किती रुपये व्यय करावे लागत असतील, याची कल्पनाच करता येत नाही ! |