महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या पोस्टवरून बांगलादेशात हिंदु तरुणाच्या घराची मुसलमानांकडून तोडफोड !

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील गोपालगंज भागातील कोटालीपारा येथे मुसलमानांच्या जमावाने महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍या फेसबुक पोस्टवरून एका हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली. १५ जानेवारीला सायंकाळी ही घटना घडली. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या तरुणाच्या चुलत भावाने सांगितले की, फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते ठाऊक नाही.

१. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कथित पोस्टमुळे कोटालीपारा आणि बरिसाल उपजिल्ह्यातील अनेक गावांतील मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यानंतर काही स्थानिक मुसलमानांनी तरुणाच्या घराची तोडफोड केली. हा तरुण गेल्या ७ वर्षांपासून, तर त्याचे इतर कुटुंबीय काही मासांपूर्वीच भारतात रहाण्यास गेले आहेत.

२. स्थानिक उलेमा परिषदेच्या प्रचार सचिवाने सांगितले की, फेसबुक पोस्टमुळे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत; मात्र मुसलमान म्हणून मी झालेल्या तोडफोडीचे समर्थन करत नाही.

३. पोलीस अधिकारी महंमद जिल्लूर रहमान यांनी सांगितले की, अवमानाच्या प्रकरणी आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोपी सध्या भारतात रहात असल्याने सध्या कोणतेही पाऊल उचलू शकत नाही.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशात गेल्या काही वर्षांपासून हिंदूंच्या नावाने सामाजिक माध्यमांतून अशा प्रकारचे पोस्ट करून त्यांच्यावर आक्रमण करण्याची नवी पद्धत मुसलमानांनी शोधून काढली आहे. त्याचाच हा भाग आहे, हे लक्षात येते !