रामगड (झारखंड) येथे अरमान खान याने विवाहित हिंदु महिलेची केली हत्या !

रांची – झारखंडच्या रामगड जिल्ह्यात अरमान खान याने एका विवाहित हिंदु महिलेला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मृत महिलेचे नाव ममता असे आहे. घटनेनंतर अरमान खान फरार आहे.

१. अरमान खान हा ममतावर पतीला सोडण्यासाठी दबाव टाकत होता. ममताने पतीला सोडण्यास नकार दिल्याने त्याने तिची हत्या केली. ही घटना घडली, तेव्हा ममताची ३ वर्षांची मुलगी घरात होती.

२. ममताची मोठी बहीण जया देवी यांनी सांगितले की, ममता तिच्या पतीसोबत देहलीत रहात होती. १४ जानेवारी २०२३ या दिवशी ममता तिच्या ३ वर्षांच्या मुलीसह बहिणीकडे आली होती. ममता घरी एकटीच असतांना अरमान खान याने तिला गाठले. तिचे अरमानसोबत भांडण झाले. या वेळी अरमानने ममताला काठीने बेदम मारहाण करून तिची हत्या केली.

३. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

४. मृत ममताची बहीण जया देवी यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अरमान खान याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत.

संपादकीय भूमिका 

अशा नराधमांना फाशीची शिक्षा केल्यास अशा घटना थांबतील !