अब्दुल रहमान मक्की हा ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित !

यापूर्वी चीनने त्याला वाचवण्याचा केला होता प्रयत्न !

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानी जिहादी आतंकवादी अब्दुल रहमान मक्की याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित केले. मक्की हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याचा मेहुणा आहे. त्याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित केल्यामुळे आता त्याची जगभरातील संपत्ती गोठवली जाणार आहे. मक्की यापुढे शस्त्रे खरेदी करू शकणार नाही आणि अधिकार क्षेत्राबाहेर प्रवासही करू शकणार नाही. भारत आणि अमेरिका यांनी यापूर्वीच मक्कीला त्याच्या देशांतर्गत कायद्यानुसार आतंकवादी घोषित केले आहे. मक्की पैसे गोळा करण्यात, तरुणांना आतंकवादी बनवण्यात, तसेच भारतात (विशेषत: जम्मू आणि काश्मीरमध्ये) आक्रमणे करण्याची योजना बनवण्यात गुंतलेला होता.

गेल्या वर्षी जूनमध्ये चीनने मक्की याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत अडथळा आणला होता; परंतु या वेळी चीनने मक्की याला पाठिंबा दिला नाही.