काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

आतंकवादी अरबाज मीर आणि शाहिद शेख

बडगाम (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना ठार मारले. अरबाज मीर आणि शाहिद शेख अशी त्यांची नावे आहेत. सैनिक आणि पोलीस यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

संपादकीय भूमिका

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक !