सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे) हिला तिची आई, आजी आणि काही संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

एका संतांनी प्रार्थनाला विचारले, ‘‘आईकडून शिकतेस ना ?’’ तेव्हा प्रार्थना म्हणाली, ‘‘हो.’’ त्यानंतर तिने आईकडून शिकायला मिळालेली पुढील सूत्रे सांगितली.

साधना समजल्याविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. जान्हवी जेरे (वय १२ वर्षे) हिने व्यक्त केलेली कृतज्ञता !

भोवळ येऊन साधिका स्नानगृहात पडली तेव्हा साधना समजल्या विषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय ११ वर्षे) हिच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

निद्रादेवीला ‘झोपेत प्रार्थना चालू राहू दे’, अशी प्रार्थना करून झोपल्यामुळे रात्रभर ‘निर्गुण’ हा नामजप चालू रहाणे आणि सकाळी उठल्यावर इतर दिवसांपेक्षा अधिक प्रसन्न अन् उत्साही वाटणे

हिंदु धर्मग्रंथातील सूत्रे प्राचीन असूनही काळाच्या कसोटीवर सत्यात उतरणारी असणे, याची साधिकेला आलेली प्रचीती !

भृगु महर्षींच्या सांगण्यावरून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे केलेल्या पितृपूजनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !’ या लेखातील भगवान श्रीविष्णु, सूर्यकिरण आणि पितृकलशाच्या संदर्भातील लिखाण वाचल्यावर माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधकांनो, सध्या होणार्‍या विविध त्रासांवर मात करण्यासाठी स्वतःची साधना वाढवा !

‘सध्या अनेक साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. त्रासांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे हे प्रमाण आपत्काळ समीप आल्याचे दर्शवत आहे. ‘या आपत्काळातून तरून जाण्यासाठी स्वतःची साधना वाढवणे, हाच एकमेव पर्याय आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे.

पू. भिडेगुरुजी यांना नोटीस बजावून पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना तात्काळ पदावरून हटवा !

भीमा-कोरेगाव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे येनकेन प्रकारेण पू. भिडेगुरुजींना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ‘हॅलोवीन’ या पाश्‍चात्त्य कार्यक्रमाचे आयोजन !

पाश्‍चात्त्यांप्रमाणे भारतात व्हॅलेंटाईन डे, ३१ डिसेंबर साजरे केले जातात, त्यातच आता ‘हॅलोवीन’ची भर पडली आहे. पाश्‍चात्त्यांच्या या सांस्कृतिक आक्रमणांपासून भारताला वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्रच अपरिहार्य आहे !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची संपत्ती जप्त होणार !

एप्रिल मासात ईडीने मलिक यांच्या कुटुंबाची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली होती. अधिनिर्णय प्राधिकरणाने आता या जप्तीला संमती दिली आहे. 

(म्हणे) ‘पंजाब दौर्‍यात अनुचित प्रकार घडल्यास त्याला तुम्हीच उत्तरदायी असाल !’

आता केंद्र सरकारने खलिस्तानवाद्यांची कीड मुळासह नष्ट करण्यासाठी पावले उचलायला हवीत !