साधना समजल्याविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. जान्हवी जेरे (वय १२ वर्षे) हिने व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. जान्हवी जेरे

‘१७.२.२०२० या दिवशी संध्याकाळी मी कडकडीत पाण्याने अंघोळ करत होते. त्यामुळे मला गरगरल्यासारखे होऊ लागले. मी लगेच ‘ॐ गं गणपतये नमः । हा नामजप चालू केला. नंतर आईने मला कापूर लावायला दिला. मी पू. भावना शिंदे यांनी दिलेला प्रसाद ग्रहण केला आणि मला लगेचच बरे वाटू लागले. तेव्हा मला जाणीव झाली, ‘मी साधनेत नसते, तर मला नामजपादी उपायांविषयी समजले नसते. कदाचित् भोवळ येऊन मी स्नानगृहात पडले असते.’ तेव्हा मला साधना समजल्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– कु. जान्हवी जेरे, सॅन डिएगो, अमेरिका. (१७.२.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक