बालवयात तुझे
साधकत्व अनुभवले ।
तरुणपणी तुझे समष्टी
गुण अनुभवले ।
‘संत’ म्हणून तुझे
चैतन्यही अनुभवले ।
परम पूज्यांनी (टीप १) तुझ्या रूपाने सदैव मला सांभाळले ।। १ ।।
भाव तुझ्या डोळ्यांत नेहमीच दिसायचा ।
तुझ्यासारखे बनायचा ध्यास मला लागायचा ।
तुझा आदर्श परम पूज्यांनी दिला सर्वांना ।
गाठलेस तू संतपद आणि आनंद झाला सर्वांना ।। २ ।।
तुझे ते निरागस, खट्याळ वागणे अजूनही आठवते ।
आता तुझ्यासारखे घडायचे आहे, याची आठवण होते ।
‘प्रत्येक प्रसंग तू देवाशी कशी जोडायचीस’, हे आठवते ।
‘देव मला शिकवत आहे’, हे तुझे वाक्य अजूनही स्मरते ।। ३ ।।
मनातले तुला सहजच कळते ।
कुठे मी चुकते, ते सहजच तुला समजते ।
तुझ्या सत्संगाने मी अंतर्मुख होते ।
‘असेच तुझे मार्गदर्शन मिळावे’, अशी प्रार्थना करते ।। ४ ।।
टीप १ : परात्पर गुरु डॉक्टरांनी
– सौ. अनुश्री रोहित साळुंके (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(११.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |