स्वातंत्र्यसैनिकांना दरमास २० सहस्र रुपये निवृत्तीवेतन देण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

मुंबई – राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि गोवा मुक्तीसंग्राम या लढ्यात सहभागी सैनिकांना दरमहा २० सहस्र रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. १७ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.