भूमी बळकावल्याच्या प्रकरणी गोवा पुरातत्व खात्याने अडीच वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारींकडे पोलिसांनी केले होते दुर्लक्ष !

संबंधित पोलिसांचे भूमी माफियांशी संबंध होते का ? हे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! जनतेनेही हे प्रकरण गांभीर्याने घेऊन घोटाळेबाजांवर आणि त्यांना साहाय्य करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत !

बलात्कारानंतरच्या कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी !

यासह अशा प्रकारची चाचणी करणार्‍यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले जाईल, असेही स्पष्ट केले.

काश्मीरमधून ३ आतंकवाद्यांना अटक

अशा आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत !

सर्व देशांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी उपाययोजना काढावी ! – संयुक्त राष्ट्रे

या वर्षी ७०हून अधिक पत्रकार मारले गेले आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात कारावास भोगावा लागला आहे. त्यांच्या विरोधात हिंसाचार आणि त्यांना हत्यांच्या धमक्या मिळण्याच्या घटना वाढत आहेत, असे संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी नुकतेच सांगितले.

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील चर्चमध्ये गरीब हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर : पाद्य्राला अटक

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंचे धर्मांतर होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाहीत ! सरकारने हे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, तसेच अशा चर्चांवर बंदी घालावी !

कार्तिक वारीच्या काळात वारकर्‍यांना दर्शनासाठी सर्व त्या सुविधा देण्याचा प्रयत्न ! – बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर

कार्तिक वारीच्या काळात मंदिर २४ घंटे वारकर्‍यांना दर्शनासाठी चालू ठेवलेले आहे, तसेच रांगेत असणार्‍या वारकर्‍यांना अल्पाहार आणि चहा देण्याचे आमचे नियोजन आहे. सध्या मुखदर्शन आणि चरणदर्शन घेणार्‍या वारकर्‍यांची संख्या लाखाच्या आसपास आहे.

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या निवासस्थानी सुरक्षा प्रदान करण्यावरून देहली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी हे केवळ खासगी नागरिक नाहीत, तर सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान दिली आहे. त्यांच्या खासगी निवासस्थानी सुरक्षा देण्याची योजना कशी आहे ?,  असा प्रश्‍न देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला.

ट्विटरमधील कर्मचारी कपात होणार असल्याचे वृत्त मस्क यांनी फेटाळले

जगातील सर्वांत श्रीमंत अब्जाधीश आणि आता ट्विटरचे मालक असलेले इलॉन मस्क यांनी ट्विटरमधील कर्मचारी कपातीचे वृत्त खोटे असल्याचे सांगत ते फेटाळून लावले.

करीमनगर (तेलंगाणा) येथील ‘जमात-ए-इस्लामी हिंद’च्या कार्यक्रमाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

मुसलमानेतर तरुणींना दुपारच्या जेवणासाठी केले होते आमंत्रित !
विश्‍व हिंदु परिषदेने केला होता विरोध !