साम्यवादी विचारसरणीचे लुला डा सिल्वा ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष

लुला डा सिल्वा हे साम्यवादी विचारसरणीचे नेते ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत डा सिल्वा यांनी उजव्या विचारसरणीचे असलेले मावळते राष्ट्राध्यक्ष जेअर बोलसोनारो यांना पराभूत केले.

शिवलिंगाला संरक्षण मिळण्यासंदर्भातील हिंदूंची भूमिका सर्वोच्च न्यायालय ऐकणार

वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हिंदु पक्षाला मोठा दिलासा देत तेथे सापडलेल्या शिवलिंगाला संरक्षण देण्याच्या विषयावर सुनावणी करणार असल्याचे मान्य केले. याआधी ‘केवळ १२ नोव्हेंबरपर्यंत शिवलिंगाला संरक्षण देण्यात येईल’, असे न्यायालयाने म्हटले होते.

राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाल्यामागील कारण !

‘स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रतिनिधी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणारे होते. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या उत्तरदायित्वाचा नाही, तर केवळ स्वार्थाचाच विचार करणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या वाढत गेल्याने राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कर्नाटकातील अरबी शाळांमध्ये सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नाही ! – शिक्षणमंत्री

राज्य शिक्षण विभागाच्या देखरेखीखाली हे सर्वेक्षण केले जात आहे. साहाय्यक आयुक्तांना त्याचा आढावा घेण्यास सांगितले असून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांचा देहत्याग

अफाट सहनशीलता आणि देवावरील दृढ श्रद्धा यांमुळे गंभीर आजारपणाला स्थिरतेने सामोरे जाणारे सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) !

नागपूर ते पुणे प्रवास ८ घंट्यांत शक्य ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

नागपूर ते पुणे हा प्रवास आता केवळ ८ घंट्यांत शक्य होणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाला ‘एक्सेस ग्रीन एक्सप्रेस-वे’ने जोडण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.

दीपावलीच्या निमित्ताने राजेश क्षीरसागर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ भेट !

दीपावलीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

पत्नीला घरातील कामे सांगणे क्रौर्य होत नाही !

‘विवाहित महिलेला घरातील कामे करण्यास सांगणे, ही क्रूरता नाही, तसेच घरातील सुनेने केलेल्या कामांची तुलना मोलकरणीच्या कामाशी होऊ शकत नाही’, असे महत्त्वाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी नोंदवले आहे

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या विश्‍वव्यापक कार्यात सहभागी व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

भगवंताच्या कृपेमुळे राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे अनेक आघात रोखण्यात समितीला यश मिळाले आहे. समितीच्या वतीने देवतांचे विडंबन, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, मंदिर सरकारीकरण, धर्मांतर या धर्मावरील आघातांच्या विरोधात व्यापक जनप्रबोधन करण्यात आले आहे.