जैन मंदिरात चोरी करणार्‍या चोराने क्षमापत्र लिहित साहित्य केले परत !

चोरी केल्यानंतर चोराला झाला त्रास !

बालाघाट (मध्यप्रदेश) – येथील दिगंबर जैन मंदिरात २४ ऑक्टोबर या दिवशी चांदी आणि पितळच्या अनेक वस्तू चोरीला गेल्या होत्या.

याप्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. ४ दिवसानंतर मंदिरातील चोरीला गेलेले साहित्य एका खड्डयात सापडले. तेथे एक चिठ्ठीही आढळली. त्यात चोराने ‘मी केलेल्या कृतीमुळे मला फार त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या वस्तू मी परत करत आहे. ज्या कुणाला या वस्तू मिळतील, त्यांनी कृपया जैन मंदिरात परत नेऊन द्याव्यात. माझ्याकडून चूक झाली आहे, क्षमा करा’, असे लिहिले होते.