सर्व देशांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी उपाययोजना काढावी ! – संयुक्त राष्ट्रे

अँटोनियो गुटेरेस

न्यूयॉर्क – या वर्षी ७०हून अधिक पत्रकार मारले गेले आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात कारावास भोगावा लागला आहे. त्यांच्या विरोधात हिंसाचार आणि त्यांना हत्यांच्या धमक्या मिळण्याच्या घटना वाढत आहेत, असे संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी नुकतेच सांगितले. सर्व देशांची सरकारे आणि जागतिक समुदाय यांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती उपाययोजना काढावी, असेही आवाहन गुटेरेस यांनी केले. पत्रकारांच्या विरोधातील गुन्ह्यांसाठी शिक्षामुक्ती समाप्त करण्याच्या २ नोव्हेंबरच्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला गुटेरेस यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांच्या कर्मचार्‍यांसाठीही सुरक्षित आणि मुक्त वातावरण निर्माण करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी उद्दिष्ट निश्‍चित केले आहे, असे गुटेरेस यांनी सांगितले.

लोकशाहीच्या संवर्धनासाठी, चुकीच्या गोष्टी उघड करण्यासाठी आणि शाश्‍वत विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी मुक्त वातावरणातील पत्रकारिता महत्त्वपूर्ण आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस म्हणाले.