फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील चर्चमध्ये गरीब हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर : पाद्य्राला अटक

मध्यभागी विजय मसिह

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हरिहरगंज चर्चमध्ये हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. या चर्चमधील विजय मसिह हा पाद्री छुप्या पद्धतीने गरीब हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी चर्चवर धाड टाकून विजय मसिह याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या नावांचे आणि पत्त्यांचे ४ आधारकार्डही जप्त केले. पोलिसांच्या अन्वेषणात पाद्री विजय मसिह याने धर्मांतर केल्याची स्वीकृती दिली आहे.

१. शहराचे मुख्य अधिकारी वीर सिंह यांनी सांगितले की, अडीच मासांपूर्वी गरीब हिंदूंचा बुद्धीभेद त्यांचे करून धर्मांतर केल्याच्या प्रकरणात पाद्री विजय मसिह याला अटक करून कारावासात पाठवण्यात आले होते. धर्मांतराच्या या टोळीमध्ये अजूनही काही ख्रिस्ती सहभागी आहेत. त्यांनाही लवकरच अटक करून कारावासात पाठवण्यात येणार आहे.

२. फतेहपूरच्या हरिहरगंज येतील चर्चमध्ये धर्मांतराची ही पहिलीच घटना नाही. १५ एप्रिल २०२२ या दिवशीही हिंदूंना आमीष दाखवून धर्मांतर केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्या वेळी विश्‍व हिंदु परिषदेने ‘या चर्चमध्ये गरीब हिंदूंना ख्रिस्ती पंथाचे शिक्षण देऊन त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केले जाते’, असे निदर्शनास आणून देत विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी एका पाद्य्रासह २६ जणांना अटक करून कारावासात पाठवले होते.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या गरिबीचा अपलाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या धूर्त ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा !
  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंचे धर्मांतर होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाहीत ! सरकारने हे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, तसेच अशा चर्चांवर बंदी घालावी !
  • हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन स्वतःतील धर्माभिमान वाढवणे, हाच त्यांचे धर्मांतर रोखण्याचा प्रभावी उपाय आहे !