डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या निवासस्थानी सुरक्षा प्रदान करण्यावरून देहली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

नवी देहली – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी हे केवळ खासगी नागरिक नाहीत, तर सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान दिली आहे. त्यांच्या खासगी निवासस्थानी सुरक्षा देण्याची योजना कशी आहे ?,  असा प्रश्‍न देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला. तेथे सुरक्षा कर्मचार्‍यांसाठी अद्याप कोणतीही पायाभूत सुविधा निर्माण केलेली नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. ‘सणासुदीच्या काळात संपूर्ण शहरात सुरक्षाव्यवस्था सांभाळण्यात सुरक्षा कर्मचारी गुंतले असल्याने व्यवस्था करता येत नाही’, हा केंद्र सरकारचा युक्तीवाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. यावर आता ३ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

डॉ. स्वामी यांना झेड श्रेणीच्या सुरक्षा आहे. जानेवारी २०१६ मध्ये केंद्र सरकारने त्यांना देहलीत ५ वर्षांसाठी बंगला दिला होता. एप्रिल २०२२ मध्ये त्याची मुदत संपली. त्यांना बंगला रिकामा करायचा होता; मात्र सुरक्षेवरून त्यांनी पुन्हा बंगला मिळावा, यासाठी देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.